PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023   

PostImage

Cripto carrancy : 9 विदेशी क्रिप्टो कंपन्यांना नोटीस ,भारत सरकारने …


 

दिल्ली, . नोंदणीकृत नसलेल्या क्रिप्टो करन्सीचा वाढता वापर लक्षात घेता भारत सरकारने सुरुवातीपासूनच क्रिप्टोकरन्सीबाबत कठोर भूमिका कंपन्यांवर भारतात प्रचंड कर लादला जात आहे. आता अर्थ मंत्रालयाने 9 विदेशी क्रिप्टो कंपन्यांना मनी लांड्रिंग कायद्यांतर्गत नोटीस बजावली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने गुरुवारी माहिती दिली आहे. मंत्रालयानुसार, या कंपन्यांना मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

 

नोटीस बजावलेल्या कंपन्यांमध्ये Bi- nance, KuCoin, Huobi, Kraken, Get.io, Bittrex, Bit stamp, MEXC Global आणि Bitfinex चा समावेश आहे. भारताच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने या सर्व 9 विदेशी क्रिप्टो कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसपाठवली आहे. क्रिप्टो कंपन्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये कोणतीही टाईमलाईन दिलेली नाही. याचा अर्थ कंपन्यांना कधी उत्तर द्यावे लागेल किंवा त्यांच्यावर कधी कारवाई केली जाईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतातील क्रिप्टो कंपन्यांवर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे.

 

 

 

एफआययूमध्ये नोंदणी बंधनकारक

 

डिसेंबरच्या सुरुवातीला, सरकारने माहिती सांगितले होते की, 28 देशांतर्गत क्रिप्टो कंपन्यांनी फायनान्शियल इंटेलिजेन्स युनिटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे. आता अशा कंपन्यांची संख्या 31 झाली आहे. तसेच भारतात असलेल्या सर्व क्रिप्टो कंपन्यांना एफआययूमध्ये नोंदणी करणेबंधनकारक आहे.